Udayanraje Bhosale |”…तर मिश्याच काय, भुवया देखील काढू”; शिवेंद्रराजेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर उदयनराजे संतापले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Udayanraje Bhosale | सातारा : महाराष्ट्राच्या साताऱ्यातील भोसले घराण्यात अनेक दिवसांपासून वाद पहायला मिळतोय. हा वाद काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील इमारतीवर उदयनराजेंच्या समर्थकांनी त्यांचं चित्र काढलं यावरून वाद झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात वादाला तोंड फुटलं आहे. उदयनराजेंनी यावर आता भाष्य केलं.

Udyanraje Bhosale Replied To Shivendra Raje

उदयनराजे म्हणाले की, “माझं एक ठाम मत आहे की, तुम्ही एकदा समोरा समोर या आणि मी काय भ्रष्टाचार केलाय, आम्ही ते मान्य करू,” माध्यमांच्या प्रतिनिधींना उदयनराजे म्हणाले की, “हा माईक लोकांमध्ये द्या आणि त्यांना सांगू द्या की उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तसं जर कुणी बोललं तर, मिश्या काय भुवया पण काढील”, असे उदयनराजे म्हणाले.

शिवेंद्रराजे उदयनराजेंवर आक्रमक ( Shivendra Raje Agressive on Udayanraje Bhosale )

“ज्यांच्या जीवावर ते मोठे झाले, त्यांनी संस्था स्थापन केल्या. मला लाज वाटते सांगताना, बोलताना कमीपणा वाटतो, बोलू की नको बोलू असं होतं. अजिंक्यतारा कुक्कुटपालन, अजिंक्यतारा बाजार समिती, बँका, महिला बँक आणि इतर संस्थांद्वारे त्यांनी लोकांचे पैसे खाल्ले. यावर मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या घराण्यात असे लोक जन्माला आले कसे? आमच्या दारात कधी कोण आलं नाही. आई बहिणींवर कुणी शिव्या दिल्या नाहीत”, असे टीकेचे बाण शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर सोडले आहेत.

महत्वाच्या बातम्या