Fungal Infection | फंगल इन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Fungal Infection | टीम महाराष्ट्र देशा: आपल्या सर्वांनाच त्वचेशी संबंधित विविध प्रकारच्या समस्यांना (Skin problems) तोंड द्यावे लागते. यामध्ये बहुतांश लोकांना फंगल इन्फेक्शनच्या समस्येला सामोरे जावे लागते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये गरम वातावरणामुळे फंगल इन्फेक्शनची समस्या निर्माण होते. फंगल इन्फेक्शनमुळे त्वचेवर जळजळ, खाज सुटणे, लालसरपणा इत्यादी गोष्टी उद्भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या औषधांचा वापर करतात. पण ही औषधं त्वचेसोबतच आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. फंगल इन्फेक्शनच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

कडुलिंबाची पाने (Neem leaves-For Fungal Infection)

फंगल इन्फेक्शनच्या समस्यावर मात करण्यासाठी कडुलिंबाची पाने उपयुक्त ठरू शकतात. यासाठी तुम्हाला कडुलिंबाची पाने पाण्यामध्ये उकळून घ्यावी लागेल. त्यानंतर इन्फेक्शन झालेली जागा तुम्हाला त्या पाण्याने स्वच्छ करावी लागेल. कडुलिंबाच्या पानांमध्ये आढळणारे अंटीबॅक्टरियल गुणधर्म फंगल इन्फेक्शन नष्ट करण्यास मदत करतात.

कोरफड (Aloe vera-For Fungal Infection)

कोरफड आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त ठरू शकते. फंगल इन्फेक्शनच्या समस्यावर मात करण्यासाठी कोरफड मदत करू शकते. कोरफडीमध्ये आढळणारे अँटी फंगल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म फंगल इन्फेक्शन दूर करण्यास फायदेशीर ठरू शकतात. यासाठी तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालेल्या जागेवर दिवसातून दोन ते तीन वेळा कोरफड लावावी लागेल. कोरफडीचा वापर केल्याने फंगल इन्फेक्शन दूर होऊ शकते.

हळद (Turmeric-For Fungal Infection)

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात, त्यामुळे हळद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यासाठी तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालेल्या जागेवर हळदीची पेस्ट लावावी लागेल. तुम्ही हळद पावडरमध्ये पाणी घालून त्याची पेस्ट बनवू शकतात. ही पेस्ट तुम्हाला साधारण वीस मिनिटे फंगल इन्फेक्शनवर लावून ठेवावी लागेल. काही दिवस फंगल इन्फेक्शनवर हळद लावल्याने ते दूर होण्यास मदत होते.

फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी तुम्ही वरील घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर त्रिफळाचा खालील पद्धतीने वापर केल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

त्रिफळा पेस्ट (Triphala paste-For Skin Care)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये त्रिफळा चूर्ण घेऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला साधारण दोन ते तीन मिनिटे चेहऱ्यावर वर्तुळाकार पद्धतीने मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल. दिवसातून दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा निरोगी राहू शकते.

त्रिफळा फेस पॅक (Triphala Face Pack-For Skin Care)

त्रिफळा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा त्रिफळा पावडरमध्ये कडुलिंब, मध आणि लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते साधारण 30 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने स्वच्छ धुवावा लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा चमकदार आणि निरोगी राहू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या