Share

Weather Update | राज्यात कमी दाबाचा पट्टा सक्रिय, तर ‘या’ भागात पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजपासून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात हवामान विभागाकडून वादळी पावसाचा … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजपासून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात हवामान विभागाकडून वादळी पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे, आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यातील वातावरणात (Weather Update) मोठा बदल झाला आहे. जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

राज्यामध्ये सध्या वादळी पावसाला पोषक हवामान (Weather Update) तयार झाले आहे. आज (24 मार्च) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये मेघगर्जना, विजा आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर कोकणातील बहुतांश भागांमध्ये हलक्यातील ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही