Bel Juice | दररोज सकाळी रिकाम्या पोटी बेलाचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bel Juice | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये बेलफळ सहज उपलब्ध होते. बेलफळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर बेलफळाचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी, बीटा केरोटीन, विटामिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त इत्यादी घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी बेलाच्या रसाचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी बेलाचा रस प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Bel Juice)

बेलफळामध्ये भरपूर प्रमाणात अँटीबॅक्टरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आढळून येतात. त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत करते. बेलफळाच्या सरबताचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने गॅस, ऍसिडिटी, अपचन, बद्धकोष्टता यासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी बेलफळाचा ज्यूस प्यायल्याने गॅस्ट्रिक अल्सरची लक्षणे कमी होऊ शकतात.

डायबिटीज नियंत्रणात राहतो (Diabetes remains under control-Bel Juice)

तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल तर सकाळी रिकाम्या पोटी बेलफळाच्या ज्यूसचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बेलफळामध्ये आढळणारे गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल, तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी बेलफळाचे सरबताचे सेवन केले पाहिजे.

रोगप्रतिकारशक्ती वाढते (Increases immunity-Bel Juice)

बेलफळाच्या सरबताचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी हे सरबत प्यायल्याने तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर नियमित याचे सेवन केल्याने बॅक्टेरिया आणि विषाणूमुळे होणारे समस्या देखील कमी होऊ शकतात.

सकाळी रिकाम्या पोटी बेलफळाचा ज्यूस प्यायल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर ओव्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

पचनसंस्था निरोगी राहते (The digestive system remains healthy-Carom Seeds)

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पचनाच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. या समस्यांवर मात करण्यासाठी ओव्याचे पाणी उपयुक्त ठरू शकते. ओव्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने गॅस, बद्धकोष्टता, ऍसिडिटी यासारख्या समस्या दूर होऊ शकतात.

डायबिटीस नियंत्रणात राहते (Diabetes remains under control-Carom Seeds)

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ओव्याच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. डायबिटीसच्या रुग्णांनी जेवणानंतर ओव्याच्या पाण्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. तुम्ही जर डायबेटीसचे रुग्ण असाल, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ओव्याच्या पाण्याचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या