Job Opportunity | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, अहमदनगर अंतर्गत श्रीरामपुर तालुक्यातील विविध गावांमध्ये सेवा व मदतनीस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

एकात्मिक बल विकास सेवा योजना विभाग यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये अंगणवाडी मदतनीस पदाच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर, जुनी पंचायत समिती पारनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1P-3D79FUaJ779Q4FPLgTyJ4v9EdQOK_X/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://ahmednagar.nic.in/

महत्वाच्या बातम्या