Runny nose | नाक वाहनाच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Runny nose | टीम महाराष्ट्र देशा: बदलत्या वातावरणामुळे बहुतांश लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. बहुतांश लोकांना सर्दी इतकी तीव्र असते की सतत नाक वाहनाच्या समस्येला सामोरे जावे लागते. वाहत्या नाकाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करत असतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. हे उपाय केल्याने नाक वाहण्याची समस्या सहज सुटू शकते. वाहत्या नाकाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात.

मिठाचे पाणी (Salt water-Runny nose)

वाहत्या नाकाच्या समस्येवर मात करण्यासाठी मिठाचे पाणी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक कप पाण्यामध्ये एक चमचा मीठ मिसळून ते पाणी उकळून घ्यावे लागेल. हे पाणी कोमट झाल्यानंतर तुम्हाला ते ड्रॉपच्या मदतीने एक ते दोन थेंब नाकात टाकावे लागेल. असे केल्याने नाक वाहण्याची समस्या दूर शकते.

मध (Honey-Runny nose)

मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जाते. त्याचबरोबर सर्दीच्या समस्येवर मात करण्यासाठी मध उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक चमचा मधामध्ये तीन ते चार थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या मिश्रणाचे सेवन करावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने नाक वाहण्यापासून आराम मिळू शकतो.

वाफ (Steam-Runny nose)

आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी वाफ उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर वाहत्या नाकाची समस्या सोडवण्यासाठी वाफ फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यावे लागेल. त्यानंतर त्या भांड्यातून तुम्हाला वाफ इन्हेल करण्याचा प्रयत्न करावा लागेल. वाफेचे इलेक्ट्रॉनिक यंत्र उपलब्ध असेल तर तुम्ही त्याच्या साहाय्याने वाफ घेऊ शकतात. नियमित वाफ घेतल्याने सर्दीची समस्या दूर होऊ शकते.

नाक वाहण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही वरील घरगुती उपाय करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये दररोज काकडीची कोशिंबीर खाल्ल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

शरीर हायड्रेट राहते (The body stays hydrated-Cucumber Salad)

काकडीमध्ये 90% पाणी आढळून येते, त्यामुळे काकडीचे नियमित सेवन केल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. काकडीची कोशिंबीर खाल्ल्याने तुम्ही डीहायड्रेशनच्या समस्येपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर काकडीच्या कोशिंबिरीचे नियमित सेवन केल्याने शरीर थंड राहू शकते.

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो (Can relieve constipation-Cucumber Salad)

तुम्ही जर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर तुम्ही दररोज एक वाटी काकडीच्या कोशिंबिरीचे सेवन करू शकतात. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनाच्या समस्या सुधारण्यास मदत करते. काकडीच्या कोशिंबिरीचे दररोज सेवन केल्याने पोट दुखी, पोट फुगणे, गॅस, एसिडिटी इत्यादी समस्यांपासून आराम मिळू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या