Share

Praful Patel | शरद पवारांशी आजही माझं बोलणं होतं – प्रफुल्ल पटेल

Praful Patel | अमरावती: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अशात प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी माझं आजही बोलणं होतं, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर … Read more

Published On: 

Praful Patel | अमरावती: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.

अशात प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी माझं आजही बोलणं होतं, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अमरावतीमध्ये बोलत असताना प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणाले, “गेल्यावेळी मी शरद पवार यांच्यासोबत अमरावती शहरामध्ये आलो होतो. तर आज अजित पवार यांच्यासह मी अमरावतीमध्ये दाखल झालो आहे.

आमच्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. शरद पवारांनी मला इथे पाठवलं का? असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.”

Sharad Pawar and I have close relations – Praful Patel

पुढे बोलताना ते (Praful Patel) म्हणाले, “शरद पवार आणि माझे घरगुती संबंध आहे. 1978 साली शरद पवारांनी मला बोलावून घेतलं होतं. तेव्हापासूनच मी पवार साहेबांसोबत आहे.

शरद पवार यांच्याबद्दल असलेला आदर माझ्या मनात आजही कायम आहे आणि पुढेही असाच कायम राहतील. शरद पवार माझे नेते आहे आणि कायम राहतील. आजही माझं शरद पवारांसोबत बोलणं होतं. मी त्यांच्या संपर्कात आहे.”

दरम्यान, अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार देखील भाजप सरकारला पाठिंबा दर्शवणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अशात प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. पक्षात फूट असताना राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहे? पडद्यामागं नेमकं काय घडत आहे? असे प्रश्न प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही