Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यात मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. याचे पडसाद संपूर्ण राज्यात दिसून आले आहे.
या घटनेनंतर राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचार घडताना दिसला आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
The property of our state is getting damaged – Ajit Pawar
ट्विट करत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे.
राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीनं थांबवण्याची गरज आहे. दगडफेक, जाळपोळ, हिंसाचारात आपल्या राज्याच्याच संपत्तीचं नुकसान होत आहे.
या आंदोलनामुळे नागरिकांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे दगडफेक, जाळपोळ, हिंसाचार टाळला पाहिजे. आजपर्यंत शांततेच्या, लोकशाहीच्या मार्गानं सुरु असलेलं आंदोलन यापुढेही त्याच मार्गानं पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
मी मराठा समाज बांधवांना, मराठा संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आवाहन करतो की, राज्याच्या काही भागात सुरु असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी आपण पुढे यावं. राज्याच्या साधनसंपत्तीचं नुकसान होणार नाही.
आंदोलनामुळे आपल्या माता-भगिनींच्या, बांधवांच्या जीवाला धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तसंच अंबड तालुक्यातील लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाची तयारी आहे.
मराठा बांधवांच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात सुरु असलेला हिंसाचार तत्काळ थांबवला पाहिजे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राहिल, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य, प्रयत्न करुया. राज्यातील नागरिकांनीही शांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावं, असं आवाहन आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 2, 2023
महत्वाच्या बातम्या
- Udayanraje Bhosale | इतर समाजाला न्याय, मग मराठा समाजाला न्याय का नाही? – उदयनराजे भोसले
- Shasan Aplya Dari | जालन्यात होणारा ‘शासन आपल्या दारी’ ढकलला पुढे; ‘या’ दिवशी होणार कार्यक्रम
- Chitra Wagh | ज्यांना मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, त्यांनी यावर बोलायचं नाही; चित्रा वाघांचा मविआवर टीका
- Vijay Wadettiwar | जालन्यातील घटनेचं खापर मराठा समाजावर फोडू नका – विजय वडेट्टीवार
- Uddhav Thackeray | भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी – उद्धव ठाकरे