🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई: जालना जिल्ह्यातील अंतरवरली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे.
या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीमारामध्ये पोलिसांचा दोष नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “घटना दुरुस्ती करून मराठा, ओबीसी इत्यादींना आरक्षण देता येईल का? याबाबत सरकारनं विचार करायला हवा.
आपल्या स्वार्थासाठी सरकार घटना दुरुस्ती करू शकतं. महाराष्ट्रामध्ये एक समाज आरक्षणासाठी लढत आहे. त्यावर तुम्ही गोळ्या झाडतात, लाठी चार्ज करतात.
त्या संदर्भात घटना दुरुस्ती करून तुम्ही त्यांना न्याय का देत नाही? हा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला आहे.”
The police cannot take such a big decision without the orders of the superiors – Sanjay Raut
जालन्यात सर्व नेते गेले. मात्र, अद्याप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी गेलेले नाही. यावर उत्तर देत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना तोंड नाही.
उपोषण आणि आंदोलन चिरडून टाकण्याचे आदेश त्यांनीच दिले होते. हा जो अदृश्य फोन आला होता, तो कुणाचा होता? हा फोन मुख्यमंत्री कार्यालयातून आला होता का?
हा फोन गृहमंत्री कार्यालयातून होता का? हा फोन नेमका कुणाचा होता? जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीमारामध्ये पोलिसांचा दोष नाही. ते आता यामध्ये पोलिसांचा बळी देत आहे.
वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय पोलीस एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही. हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्यांना वरून आदेश आल्यानंतर ही घटना घडली. हे आदेश वरून म्हणजे कुठून आले? ही गोपनीयता पोलीस अधिकारी पाळत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या – विजय वडेट्टीवार
- Praful Patel | शरद पवारांशी आजही माझं बोलणं होतं – प्रफुल्ल पटेल
- Uddhav Thackeray | मिंधे-फडणवीसांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पेटवापेटवी करायची काय? ठाकरे गटाचा सवाल
- Ajit Pawar | मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी – अजित पवार
- Udayanraje Bhosale | इतर समाजाला न्याय, मग मराठा समाजाला न्याय का नाही? – उदयनराजे भोसले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











