Chitra Wagh | आरक्षण टिकवण्याच्या जबाबदारीपासून पळालेले तुम्ही भगोडे आणि कायर; चित्रा वाघांची संजय राऊतांवर टीका
Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीहल्ला केला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आता उमटताना दिसत आहे.
या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली होती. महाराष्ट्रात जनरल डायरचं राज्य आहे.
एक नाही तर तीन तीन जनरल डायर सध्या राज्य चालवत आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता.
संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आरक्षण टिकवण्याच्या जबाबदारीपासून पळालेले तुम्ही भगोडे आणि कायर आहात, असं म्हणतं चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना धारेवर धरलं आहे.
चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत संजय राऊतांना सुनावलं आहे. ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “ह्या ‘सामना’वीराने झाडलेल्या फुसक्या फैरी ऐकल्या. आम्ही जनरल डायर की आणखी कोण, ते मायबाप महाराष्ट्रच ठरवेल.
पण, देवेंद्र फडणवीस जी यांच्या सरकारने दिलेल्या आणि मोठ्या कष्टाने उच्च न्यायालयात टिकवलेल्या मराठा आरक्षणावर वरवंटा फिरवणारा खरा जनरल डायर हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
त्यांच्या नाकर्त्या धोरणाची परिणती सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण धारातीर्थी पडण्यात झाली. संजय राऊत तुम्ही आरक्षण टिकवण्याच्या जबाबदारीपासून पळालेले भगोडे आणि कायर आहात.”
ह्या 'सामना'वीराने झाडलेल्या फुसक्या फैरी ऐकल्या. आम्ही जनरल डायर की आणखी कोण, ते मायबाप महाराष्ट्रच ठरवेल
पण,
देवेंद्र फडणवीस जी यांच्या सरकारने दिलेल्या आणि मोठ्या कष्टाने उच्च न्यायालयात टिकवलेल्या मराठा आरक्षणावर वरवंटा फिरवणारा खरा जनरल डायर हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 4, 2023
There are three General Dyers in the state – Sanjay Raut
दरम्यान, आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये सध्या जनरल डायरचं राज्य सुरू आहे. राज्यात सध्या एक नाही तर तीन जनरल डायर आहे. यामध्ये एक मुख्य आणि दोन उप जनरल डायर आहे.
राज्यामध्ये सध्या जनरल डायरच्या मानसिकतेनं राज्य कारभार सुरू आहे. जे विरोधात जातील, त्यांच्यावर लाठी चार्ज आणि हल्ला घडवला जाईल.”
महत्वाच्या बातम्या
- Pankaja Munde | मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही – पंकजा मुंडे
- Raj Thackeray | लाठी चार्ज करणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी केली पाहिजे – राज ठाकरे
- Uddhav Thackeray | राज्यात पुन्हा एकदा काका-पुतणे येणार आमने-सामने! ठाकरे गटात होणार प्रवेश
- Sanjay Raut | जालन्यात झालेल्या लाठीमारामध्ये पोलिसांचा दोष नाही – संजय राऊत
- Vijay Wadettiwar | ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या – विजय वडेट्टीवार