Eknath Shinde | मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? CM शिंदेंचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर जरांगेंच्या भेटीला

Eknath Shinde | जालना: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला केला आहे.

या घटनेनंतर मराठा संघटनांकडून राज्यात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज सातारा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बंद पुकारण्यात आलं आहे.

अशात उपोषण स्थळी अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची सरकारचे प्रतिनिधी म्हणून भेट घेतली आहे. खोतकर आणि जानकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन मनोज जरांगे यांच्या भेटीला आले आहे.

Arjun Khotkar has requested Manoj Jarange to withdraw his hunger strike

अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांना आपले उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मित्रमंडळ उपसमितीच्या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन देखील खोतकर यांनी जरांगे यांना केलं आहे.

मराठा आरक्षणाचा जीआर कोर्टात टिकावा, यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असं अर्जुन खोतकर यांनी जरांगे यांना सांगितलं असल्याची माहिती मिळाली आहे.

यावर मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मी पाणी पितो, तुम्ही आरक्षण जाहीर झाल्याचा जीआर घेऊन या, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या एक बैठक पार पडली आहे.

या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत तोडगा निघाला असल्याचं बोललं जात आहे. या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. अशात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.