Sharad Pawar | मुंबई: 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठी उलाढाल झाली होती. या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.
अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी आणि माजी आमदारांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
Sharad Pawar has called a meeting of MLAs in Mumbai on September 10
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी 10 सप्टेंबर रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी आणि माजी आमदारांची बैठक बोलावली आहे.
या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या बैठकीत महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.
शरद पवार गटाच्या या बैठकीमध्ये काय चर्चा होईल? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अशात 05 सप्टेंबर रोजी शरद पवार यांची जळगावमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे.
या सभेत शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपवर सरकारला धारेवर धरतील, अशा चर्चा जळगाव जिल्ह्यात सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील सभेनंतर शरद पवारांनी अचानक आमदारांची बैठक बोलावल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | अजित पवार सत्तेतून बाहेर पडा; बारामतीकरांची जोरदार घोषणाबाजी
- Chitra Wagh | आरक्षण टिकवण्याच्या जबाबदारीपासून पळालेले तुम्ही भगोडे आणि कायर; चित्रा वाघांची संजय राऊतांवर टीका
- Pankaja Munde | मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही – पंकजा मुंडे
- Raj Thackeray | लाठी चार्ज करणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी केली पाहिजे – राज ठाकरे
- Uddhav Thackeray | राज्यात पुन्हा एकदा काका-पुतणे येणार आमने-सामने! ठाकरे गटात होणार प्रवेश