Share

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे खोटं बोलण्यात वस्ताद; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल

🕒 1 min readUddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाचं आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या प्रकरणानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.Related News for Youजयंत पाटलांनी फडणवीसांना सांगितला मास्टरप्लॅन… … Read more

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाचं आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.

या प्रकरणानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मराठा समाजाच्या वेदनाची मला पूर्ण जाण आहे, तर गृहमंत्री फडणवीस तिसऱ्या दिवशी माफी मागण्याची मखलाशी करतात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे खोटे बोलण्यात वस्ताद आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Samana Editorial

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे. मुख्यमंत्री हे खोटे बोलण्यात वस्ताद आहेत. आधी तुमची पोपटपंची बंद करा व जालन्यातील मराठा आंदोलकांवर गोळया चालवण्याचे, अमानुष लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले ते सांगा.

तर तुम्ही खरे मराठा! एका तोंडाने आंदोलकांवर लाठया गोळया चालवायचे आदेश द्यायचे व दुसऱ्या तोंडाने मला तुमच्या वेदनांची जाण आहे, असे सांगायचे हे ढोंग आहे.

जालन्याच्या आंतरवाली गावातील मनोज जरांगे-पाटलांनी शिंदे-फडणवीस पवार या दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला आहे!

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असतानाच जालन्यात पेटलेल्या मराठा आंदोलनाचा भडका जास्तच वाढला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मनोज जरांगे-पाटील उपोषणास बसले व शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर शिंदे फडणवीस पवारांच्या सरकारने अमानुष लाठीमार केला, बंदुका चालवल्या. शिंद फडणवीस अजित पवार सोडून सगळेच नेते जरांगे पाटलांच्या गावात जाऊन आले.

सारवासारवी म्हणून सरकारने आता जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा बळी घेतला आहे. मात्र मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय मराठा आंदोलकांवर निर्घृण हल्ला होऊच शकत नाही.

त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का? नागपूरच्या चाणक्यांचे जामनेरी चाणक्य गिरीश महाजन हे मनोज जरांगे-पाटलांना भेटायला गेले.

मराठा आरक्षणासाठी सरकार काय काय करते आहे ते त्यांनी सांगितले, पण जरांगे- पाटील यांनी खिशातून बंदुकीची गोळी काढून महाजनांच्या हाती दिली व सांगितले, “तुमच्या सरकारने मराठा आरक्षणासाठी हे केले.

आम्ही आरक्षण मागितले सरकारने बंदुकीची गोळी दिली.” तसेच “मराठा आरक्षणाचा सरकारी आदेश म्हणजे ‘जीआर’ हातात पडत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही,” असा दम जरांगे पाटलांनी भरला.

जालन्याच्या आंतरवाली गावात एक सर्वसामान्य कार्यकर्ता जिद्दीने त्याच्या समाजासाठी उपोषणाला बसला आहे. त्याने प्राण पणास लावले आहेत व खोकेवाल्या सरकारपुढे तो झुकायला तयार नाही.

दिल्ली विधानसभेवर ताबा मिळविण्यासाठी मोदी सरकारने एका रात्रीत अध्यादेश आणला. संसदेत घटना दुरुस्ती करून दिल्लीतील लोकशाही मोडून केजरीवाल सरकारचे सर्व अधिकार हातात घेतले.

मग मराठा आरक्षणासाठीही केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवून प्रश्न सोडवायला हवा. कोणाच्याही ताटातले काढून न घेता सर्वमान्य होईल असा निर्णय घेतला पाहिजे, पण भाजपचे आमदार नितेश राणे काँग्रेस पक्षात असताना जे म्हणाले तेच खरे, “फडणवीस मराठयांना आरक्षण देणार नाहीत.

हे हाफ चड्डीवाल्यांचे सरकार आहे.” राणे आज भाजपात आहेत त्यांचे तेच मत कायम असावे, पण त्या हाफ चड्डीवाल्या सरकारची नाडी एका सामान्य जरांगे पाटलांनी खेचली तेव्हा त्यांच्यावर निर्माण हल्ला केला.

आंदोलकांवर केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध लोकांनी रस्त्यांवर उतरून केला श्री फडणवीस मुख्यमंत्री असताना भीमा कोरेगावची दंगल पेटली व फडणवीस हात चोळत बसले आता ते गृहमंत्री आहेत व मराठा आंदोलन हिंसक झाले.

मराठा समाजाने आता दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही इशाराच दिला आहे, ‘फडणवीसांच्या सरकारमधून लगेच बाहेर पडा, नाहीतर परिणामांना सामोरे जा. हा इशारा गंभीर स्वरूपाचा आहे.

संपूर्ण राज्य या प्रश्री पेटवून राजकीय भाकच्या शेकण्यासाठी मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला घडवून आणला काय? गोळीबार व लाठीमार ही फडणवीस यांची दोन प्रमुख शस्त्रे दोन प्रमुख शस्त्रे

आहेत रिफायनरीविरोधात आंदोलन करणाऱ्या कोकणी जनतेवरही पोलिसांनी असाच लाठीमार करून डोकी फोडली होती. वारकऱ्यांवरही त्याच निर्घृण पद्धतीने हल्ले देहूमध्ये झाले.

या सरकारचे डोके फिरले आहे व त्यांना फक्त लाठयाच चालवता येतात. मनोज जरांगे म्हणतात ते खरेच आहे. जरांगे पाटील म्हणतात, “कुणाला तरी उपोषणाला बसवायचे.

ती व्यक्ती मरणाला टेकली की त्याला घेरायचे असे उपमुख्यमंत्री फडणवीस विरोधकांना उद्देशून म्हणाले होते.” जरांगे- पाटलांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे.

भाजपने फडणवीसांसारख्या लोकांना पक्षात ठेवू नये, अन्यथा ते मराठय़ांना गोळ्या घालतील, असा संताप जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. त्या संतापाची धग आज महाराष्ट्र भोगतो आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मराठा समाजाच्या वेदनाची मला पूर्ण जाण आहे, तर गृहमंत्री फडणवीस तिसऱ्या दिवशी माफी मागण्याची मखलाशी करतात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे खोटे बोलण्यात वस्ताद आहेत.

आधी तुमची पोपटपंची बंद करा व जालन्यातील मराठा आंदोलकांवर गोळया चालवण्याचे, अमानुष लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले ते सांगा. तर तुम्ही खरे मराठा!

एका तोंडाने आंदोलकांवर लाठया गोळया चालवायचे आदेश द्यायचे व दुसऱ्या तोंडाने मला तुमच्या वेदनांची जाण आहे, असे सांगायचे हे ढोंग आहे. जालन्याच्या आंतरवाली गावातील मनोज जरांगे पाटलांनी रिदि फडणवीस पवार या दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला आहे!

सौजन्य – सामना

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!