Bacchu Kadu | सरकारने अंत पाहू नये, नाहीतर सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही – बच्चू कडू

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे.

या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहे. या घटनेनंतर अनेक नेते आंदोलकांना भेटण्यासाठी जालन्यामध्ये दाखल झाले आहे.

अशात आता या प्रकरणावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वेळ पडली तर मी देखील उपोषणाला बसायला मागे पुढे पाहणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “आज या लोकांचं जे आंदोलन सुरू आहे, त्याचा सन्मान करणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील मराठा कुणबी असून ही काळा दगडावरची पांढरी रेघ आहे.

सरकारी कार्यालयामध्ये ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे. त्यांना सरकारने तातडीने प्रमाणपत्र द्यावे. सरकारने वेगळा कायदा करण्याच्या भानगडीत पडू नये.

वेळ पडली तर मी देखील उपोषणाला बसायला मागे पुढे पाहणार नाही. फक्त सरकारने अंत पाहू नये, नाही तर सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही. जर माफी मागून राज्य शांत राहत असेल तर ते चांगलं आहे. मात्र, लाठी हल्ला ही अधिकाऱ्यांची बदनामी आहे.”

The incident in Jalna district is very unfortunate – Devendra Fadnavis

दरम्यान, जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “जालना जिल्ह्यात घडलेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे.

पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. राज्यात अशा प्रकारच्या बळाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. याआधी देखील मी पाच वर्ष गृहमंत्री होतो.

मात्र, त्यावेळी आम्ही कधीच बळाचा वापर केला नाही. जालन्यामध्ये देखील बळाचा वापर करण्याचं काहीच कारण नव्हतं. या घटनेमध्ये ज्या निष्पाप नागरिकांना इजा झाली आहे, त्यांची मी शासनाच्या वतीने जाहीर माफी मागतो.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.