Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.
या प्रकरणानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. अशात या प्रकरणावर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठ्या मनानं मराठा समाजाची माफी मागितली याचा मला आनंद आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
Everyone should take care of Manoj Jarange’s health – Vijay Wadettiwar
आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनानं माफी मागितली याचा मला आनंद आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकर तोडगा निघायला हवा. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. एखादा माणूस जेव्हा समाजासाठी लढतो तेव्हा त्याची काळजी घेण्याची जबाबदारी शासनाची असते.
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, अधिकच आरक्षण वाढवून द्या. यानंतर ओबीसी समाज जी भूमिका मांडेल, तीच आमची भूमिका असेल.”
पुढे बोलताना ते (Vijay Wadettiwar) म्हणाले, “माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या मूळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि हे मी एक ओबीसी नेता म्हणून सांगत आहे. यासाठी माझा जीव गेला तरी चालेल.
यामध्ये कुठे काय करायचं? हे सरकारनं बघून घ्यावं. त्याचबरोबर मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचं काम करू नये. सरकार एकीकडं वेगळी भूमिका बजावतो आणि दुसरीकडं चंद्रशेखर बावनकुळे वेगळी भूमिका सांगतात.
लोकांना फसवण्याचं काम सुरू आहे. सरकार लोकांच्या डोळ्यांमध्ये धुळ फेकण्याचं काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी समाजाचं नुकसान होऊ नये. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची फिरवा फिरवी नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा आंदोलन आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे घेणार आज मोठा निर्णय
- Uddhav Thackeray | मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे खोटं बोलण्यात वस्ताद; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- Bacchu Kadu | सरकारने अंत पाहू नये, नाहीतर सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही – बच्चू कडू
- Ajit Pawar | लाठी हल्ल्याचे वरून आदेश आल्याचं विरोधकांनी सिद्ध करून दाखवावं – अजित पवार
- Eknath Shinde | मनोज जरांगेंच्या मागण्यांवर सरकार काम करतंय – एकनाथ शिंदे