Share

Pravin Darekar | उद्धव ठाकरेंसारख्या घर कोंबड्यानं फडणवीसांची लायकी काढू नये – प्रवीण दरेकर

Pravin Darekar | मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा सध्या चांगला तापला आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयाच्या आसपास फिरण्याची कुवत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर … Read more

Published On: 

Pravin Darekar | मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा सध्या चांगला तापला आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक टीका केली होती.

देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयाच्या आसपास फिरण्याची कुवत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अडीच वर्ष जो व्यक्ती मंत्रालयात जाऊ शकत नाही. जो व्यक्ती शासन समजून घेऊ शकत नाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची लायकी काढू नये, असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे.

Entire Maharashtra knows the worth of Devendra Fadnavis – Pravin Darekar 

प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या मनात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल द्वेष आणि मत्सर भरला आहे. त्यामुळे ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात.

देवेंद्र फडणवीस यांची लायकी संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यांची क्षमता, त्यांचा आवाका, त्यांचं ज्ञान आणि त्यांचा अभ्यास राज्याला माहित आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची लायकी देखील महाराष्ट्राला चांगलीच माहित आहे.

अडीच वर्ष जो व्यक्ती मंत्रालयात जाऊ शकत नाही, तो व्यक्ती शासन समजून घेऊ शकत नाही, ज्याच्यामध्ये क्षमता नाही, घर कोंबड्यासारखं मातोश्रीत बसून जाणं राज्य चालवण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तींना दुसऱ्याची लायकी काढू नये.”

पुढे बोलताना ते (Pravin Darekar) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांची संसदीय कारकीर्द आणि उद्धव ठाकरेंची संसदीय कारकीर्द बघितली तर उद्धव ठाकरेंची कुवत करून येते.

उद्धव ठाकरेंना द्वेषानं बोलणं चांगलं जमतं. देवेंद्र फडणवीस यांचा विधिमंडळाचा चांगला अभ्यास आहे. एक अभ्यासक म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचं ज्ञान जर उद्धव ठाकरे काढत असतील, तर उद्धव ठाकरे यांना ज्ञानी पंडित अशी उपमा द्यावी लागेल.”

“धनाजी आणि संताजी जसे पाण्यात दिसायचे, त्याचप्रकारे सर्व राजकीय विरोधकांना देवेंद्र फडणवीस पाण्यात दिसतात. म्हणून सातत्याने त्यांच्यावर टीका केली जाते.

राज्यावर नेतृत्व करणारा एकमेव नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची क्षमता राज्याला दाखवून दिली आहे”, असही ते (Pravin Darekar) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही