🕒 1 min read
Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
यानंतर हा मुद्दा आणखीनच तीव्र झाला आहे. अशात या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी तोडगा सांगितला आहे.
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “ओबीसींच्या कोट्यात आणखी एक वाटेकरी करणं, हा ओबीसी समाजावर अन्याय होईल, असं लोकांचं म्हणणं आहे. हा मुद्दा दुर्लक्ष करण्यासारखा नाही.
मात्र, या प्रकरणावर आपण एक उपाय करू शकतो. आज जी 50 टक्क्यांची अट आहे, त्यामध्ये 15 ते 16 टक्क्यांनी वाढ करावी आणि यासंदर्भात दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने करून घ्यावे.
यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. कारण आरक्षणावरून ओबीसी आणि इतर समाजामध्ये वाद व्हायला नको. त्यांच्यामध्ये कोणी वाद निर्माण करायचा प्रयत्न करत असेल, तर आम्ही त्यांना अजिबात पाठिंबा देणार नाही.”
Don’t try to create conflict between OBC and Maratha community – Vijay Wadettiwar
दरम्यान, या मुद्द्यावर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ओबीसीच्या मूळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही.
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता अधिकच आरक्षण वाढवून द्या. ओबीसी आरक्षणासाठी माझा जीव गेला तरी चालेल. यामध्ये काय कुठे कसं करायचं?
हे सरकारनं बघून घ्यावं. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका. चंद्रशेखर बावनकुळे वेगळी भूमिका सांगतात आणि सरकार वेगळी भूमिका बजावताना दिसत आहे.
लोकांना फसवण्याचे काम सध्या सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीचं नुकसान होऊ नये.”
महत्वाच्या बातम्या
- Eknath Khadse | एकनाथ खडसे देणार भाजपला मोठा झटका! माजी आमदार आणि खासदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश
- Sanjay Raut | मराठा समाजाची आणखी किती फसवणूक करणार? संजय राऊतांचा राज्य शासनाला सवाल
- Pravin Darekar | उद्धव ठाकरेंसारख्या घर कोंबड्यानं फडणवीसांची लायकी काढू नये – प्रवीण दरेकर
- Vijay Wadettiwar | जीवात जीव असेपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही – विजय वडेट्टीवार
- Maratha Reservation | मराठा आंदोलन आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे घेणार आज मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











