Sharad Pawar | जळगाव: अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार यांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षाला मोठा झटका दिला आहे. भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते काल ठाकरे गटात सामील झाले आहे. उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार यांनी देखील भाजपला धक्का दिला आहे.
BS Patil will join the Sharad Pawar group today in the presence of Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज जळगाव जिल्ह्यात जाहीर सभा पार पडणार आहे. यानंतर शरद पवार भारतीय जनता पक्षाला मोठा झटका देणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते बी एस पाटील (BS Patil) आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
बी एस पाटील यांनी तब्बल तीन वेळा जळगाव जिल्ह्यात आमदारकी भूषवली आहे. बी एस पाटील यांच्यासह काही माजी आमदार राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे. तर या पक्षप्रवेशानंतर भाजपच्या चिंतेत भर पडणार आहे.
दरम्यान, खानदेशात बी एस पाटील एक मोठं नाव आहे. 2009 च्या निवडणुकीमध्ये त्यांना भाजपनं तिकीट दिलं नव्हतं. त्यामुळं त्यांनी त्यावेळी अपक्ष निवडणूक लढवली होती.
मात्र, तेव्हा त्यांना विजय मिळवता आला नव्हता. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते स्वगृही परतले होते. त्यानंतर 2019 मध्ये बी एस पाटील पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले होते.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | जालन्यात झालेल्या लाठी हल्ल्याबाबत सरकारनं स्पष्टीकरण द्यावं – शरद पवार
- Sanjay Raut | आंदोलक 50 खोक्यांसमोर झुकणार नाही – संजय राऊत
- Sharad Pawar | मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल? शरद पवार म्हणतात…
- Eknath Khadse | एकनाथ खडसे देणार भाजपला मोठा झटका! माजी आमदार आणि खासदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश
- Sanjay Raut | मराठा समाजाची आणखी किती फसवणूक करणार? संजय राऊतांचा राज्य शासनाला सवाल