Sharad Pawar | जळगाव: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन सुरू होतं. यादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधाऱ्यांनी लाठी हल्ल्याचे आदेश दिले असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जालना जिल्ह्यात आंदोलकांवर जो लाठी हल्ला झाला त्याचे आदेश वरून म्हणजेच सरकारकडून आले असल्याचं विरोधकांनी म्हटलं होतं. विरोधकांच्या या आरोपावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लाठी हल्ल्याचे आदेश वरून आले असल्याचं विरोधकांनी सिद्ध करून दाखवावं. विरोधकांनी हे सिद्ध केलं तर मी राजकारणातून बाजूला होईल. आम्ही तिघांपैकी जर कोणी असे आदेश दिले असतील तर आम्ही राजकारणातून बाजूला होऊ.
मात्र, जर विरोधक हे सिद्ध करू शकले नाही तर त्यांनी राजकारणातून बाजूला व्हायला हवं. असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Who gave instructions to attack lathi? – Sharad Pawar
अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “कोण काय म्हणतं मला माहित नाही. जालना जिल्ह्यात लाठी हल्ला झाला आहे, मला एवढच माहित आहे.
पोलीस दलाचे लोक लाठी हल्ला करतात. लाठी हल्ला करण्याच्या सूचना कोणी दिल्या? लाठी हल्ला करण्याची खरंच गरज होती का? त्या ठिकाणी नेमकं काय झालं आहे?
या सगळ्या गोष्टींचं सरकारने आधी स्पष्टीकरण द्यावं. कारण सध्या शासन त्यांच्या हातात आहे. त्यामुळं त्यांनी या प्रश्नांची उत्तर द्यायला हवी.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | आंदोलक 50 खोक्यांसमोर झुकणार नाही – संजय राऊत
- Sharad Pawar | मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल? शरद पवार म्हणतात…
- Eknath Khadse | एकनाथ खडसे देणार भाजपला मोठा झटका! माजी आमदार आणि खासदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश
- Sanjay Raut | मराठा समाजाची आणखी किती फसवणूक करणार? संजय राऊतांचा राज्य शासनाला सवाल
- Pravin Darekar | उद्धव ठाकरेंसारख्या घर कोंबड्यानं फडणवीसांची लायकी काढू नये – प्रवीण दरेकर