Share

श्वेता तिवारीला राज ठाकरेंच्या समर्थकांकडून शिवीगाळ; अभिनेत्रीने विचारला थेट जाब!

इन्स्टामार्टच्या ऑर्डरमध्ये झुरळ सापडल्यानंतर श्वेता तिवारीने तुकाराम मुंढेंना टॅग केले. त्यानंतर स्वतःला राज ठाकरेंचे समर्थक म्हणवणाऱ्यांनी तिला अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Published On: 

Shweta Tiwari controversy with Raj Thackeray supporters and Tukaram Mundhe tag

Shweta Tiwari Controversy:  सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीला सोशल मीडियावर अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या जात आहेत. यावर अभिनेत्री श्वेता तिवारी भयंकर संतापली आहे. इन्स्टाग्रामवर तिला भयानक ट्रोल केलं जातंय. स्वतःला राज ठाकरेंचे समर्थक म्हणवून घेणाऱ्यांनी पातळी ओलांडली आहे. त्यामुळेच तिने आता थेट मनसे प्रमुखांनाच जाब विचारला आहे.

सध्या ‘द ट्रेटर्स’च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणारी श्वेता एका विचित्र घटनेमुळे चर्चेत आली. गुरुवारी सकाळी तिने इन्स्टामार्टवरून रेड बुल मागवलं होतं. त्यात चक्क झुरळ सापडलं. झुरळ घरभर फिरत असल्याचा व्हिडिओ तिने शेअर केला. यात तिने थेट अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग केलं. “मुंढे जी, तुम्ही कुठे आहात? कृपया लक्ष द्या”, असा टोला तिने लगावला.

Shweta Tiwari vs Raj Thackeray Controversy

पण वाद इथेच थांबला नाही. त्याच दिवशी श्वेताने एक मोठा गौप्यस्फोट केला. काही युजर्स तिला इन्स्टाग्रामवर अत्यंत अश्लील शब्दांत शिव्या देत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे लोक सुशिक्षित आणि चांगल्या कुटुंबातील वाटतात. श्वेताने या युजर्सच्या प्रोफाईलचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. हे लोक स्वतःला राज ठाकरेंचे समर्थक आणि अभिमानी ‘मराठी माणूस’ म्हणवून घेतात.

यावर श्वेताने तीव्र संताप व्यक्त केला. “मी आयुष्यभर महाराष्ट्रात राहिले. मराठी माणूस महिलांचा सन्मान करतो, हेच मी आजवर पाहत आले. मग महिलांना शिव्या देणं, हेच मराठी माणूस असण्याचं लक्षण उरलंय का?” असा सवाल तिने उपस्थित केला.

थेट राज ठाकरेंना उद्देशून ती म्हणाली, “जर हे लोक तुमचे समर्थक असतील, तर हे वागणं तुम्हाला मान्य आहे का? केवळ मराठी बोलणं किंवा महाराष्ट्रावर प्रेम असल्याचा दावा करणं पुरेसं नाही.”

एखादी स्त्री आवडत नसली तरी तिला शिव्या देण्याचा अधिकार कुणालाही नाही, असं तिने ठणकावून सांगितलं. तुकाराम मुंढे सध्या अन्न सुरक्षेबाबत कडक कारवाई करत आहेत. त्यामुळेच श्वेताने त्यांना टॅग करून या प्रकरणाकडे लक्ष वेधलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही