Bacchu Kadu | नाशिक: दोन महिन्याच्या राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्या आहे. राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती यात्रा काढली आहे. या यात्रेदरम्यान पंकजा मुंडे दहापेक्षा अधिक जिल्ह्यात दौरे करणार आहे.
त्यांच्या या दौऱ्यावर प्रतिक्रिया देत असताना प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडं मोठी ताकद आणि क्षमता आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Pankaja Munde has great potential – Bacchu Kadu
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “पंकजा मुंडे यांच्याकडे मोठी क्षमता आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही.
आमच्यामध्ये क्षमता आहे. त्यामुळे आम्ही स्वतः मेहनत करतो. गावागावात आणि जिल्ह्यात जातो. साडेतीनशे गुन्हे अंगावर दाखल करून घेतो. जेवढ लढायचं आहे, तेवढं आम्ही लढत आहोत.
त्याचबरोबर जेवढं काम करायचं आहे, तेवढं काम देखील आम्ही करत आहोत. पंकजा मुंडे यांनी त्यांची क्षमता तपासायला हवी. त्यांचे स्वतःचे दहा-पंधरा आमदार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत युती करू.”
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी राजकारणातून ब्रेक घेतला होता. श्रावण महिन्याच्या औचित्य साधून त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्या आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती यात्रा काढली आहे.
यानिमित्ताने त्या काल (04 सप्टेंबर) कोपरगावमध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी कोपरगाव येथील दैत्यगुरू शुक्राचार्य यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
या दौऱ्यादरम्यान पंकजा मुंडे साधारण पाच हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. त्यांचा हा दौरा फक्त देवदर्शनापुरता मर्यादित राहणार नसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
या दौऱ्यादरम्यान त्या राजकीय कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन चर्चा करतील, अशी शक्यता राज्याच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | शरद पवारांचा भाजपला दणका! बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
- Sharad Pawar | जालन्यात झालेल्या लाठी हल्ल्याबाबत सरकारनं स्पष्टीकरण द्यावं – शरद पवार
- Sanjay Raut | आंदोलक 50 खोक्यांसमोर झुकणार नाही – संजय राऊत
- Sharad Pawar | मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल? शरद पवार म्हणतात…
- Eknath Khadse | एकनाथ खडसे देणार भाजपला मोठा झटका! माजी आमदार आणि खासदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश