Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.
अशात काल राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. तरीही याबाबत कुठलाही तोडगा निघाला नाही.
याच पार्श्वभूमीवर काल (05 सप्टेंबर) रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बैठक झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
Will the Maratha reservation issue be resolved?
काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) महत्त्वाची बैठक पार पडली असल्याची माहिती मिळाली आहे.
या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या या बैठकीनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून (Maratha Reservation) ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.
ते म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकार हे मराठा समाजाचे मारेकरी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका आहे.
यासाठी राज्य आणि केंद्र सरकार काम करताना दिसत आहे. महाराष्ट्रामधील मराठा आणि धनगर समाजाकडे अत्यंत वाईट दृष्टीने बघितलं जातं.
उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीचा निषेध केला आहे. मराठा समाजाला जर खरंच आरक्षण द्यायचं असेल तर येणाऱ्या अधिवेशनात त्या संदर्भात विधेयक आणावं लागेल.”
महत्वाच्या बातम्या
- Vinayak Raut | शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाचे मारेकरी – विनायक राऊत
- Rohit Pawar | महाराष्ट्रातील जनता दिल्लीसमोर झुकणार नाही – रोहित पवार
- Bacchu Kadu | पंकजा मुंडेंसोबत आम्ही युती करू – बच्चू कडू
- Sharad Pawar | शरद पवारांचा भाजपला दणका! बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
- Sharad Pawar | जालन्यात झालेल्या लाठी हल्ल्याबाबत सरकारनं स्पष्टीकरण द्यावं – शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










