Girish Mahajan | जालना: गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. यानंतर मराठा समाजाचं आणखीनच तीव्र आंदोलन सुरू झालं आहे.
यानंतर राज्य सरकारने मराठा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सरकारचे सर्व प्रयत्न फेल ठरले आहेत. त्यानंतर काल (05 सप्टेंबर) राज्याच्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला.
परंतु राज्य सरकारचा हा प्रयत्न देखील असफल ठरला आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेणार आहे.
Today is the ninth day of Manoj Jarange’s hunger strike
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलन करताना दिसत आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. 09 व्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. मात्र, तरी देखील ते त्यांच्या आंदोलनावर ठाम आहे.
काहीही झालं तरी उपोषण मागे घेणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन जरांगे यांची भेट घेणार आहे.
गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे काय भूमिका मांडतील? याकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, उपोषणाच्या 09 व्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आज अस्वस्थ वाटत असल्यामुळे उपोषण स्थळी त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.
त्यांची प्रकृती खालावल्यानं मराठा कार्यकर्त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्य सरकारनं जरांगे यांच्या प्रकृतीकडं लक्ष घ्यावं, असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांची प्रकृती खालवल्याची माहिती मिळतात जालना, छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते उपोषण स्थळी दाखल होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | विरोधकांनी त्यांच्या आघाडीचं नाव इंडिया ठेवल्यामुळं केंद्र सरकार घाबरलं- संजय राऊत
- Maratha Reservation | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; तरीही उपोषण सुरूच
- Uddhav Thackeray | सगळेच चोर मोदी कसे? ठाकरे गटाचा खडा सवाल
- Maratha Reservation | रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची झाली बैठक; मराठा आरक्षणाबाबत घेणार मोठा निर्णय?
- Vinayak Raut | शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाचे मारेकरी – विनायक राऊत