Sanjay Raut | विरोधकांनी त्यांच्या आघाडीचं नाव इंडिया ठेवल्यामुळं केंद्र सरकार घाबरलं- संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: देशाचं नाव इंडिया रद्द करून फक्त भारत हेच नाव ठेवण्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

देशातील विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली, म्हणून इंडियाचे नामोनिशान मिटवून टाकायचे याच्यासारखा डरपोकपणा आणि विकृतपणा नाही, असं म्हणतं संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

The central government has started fearing the name of India – Sanjay Raut

आज सकाळी प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “आम्ही इंडिया आघाडी स्थापन केल्यापासून केंद्र सरकारला इंडिया नावाचं भय वाटायला लागलं आहे.

एखाद्या सरकारला आपल्या देशाच्या घटनेतील नावाची भीती वाटू लागते, हा अत्यंत विचित्र प्रकार आहे. घटनेमध्ये इंडिया आहे. देशातील विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली, म्हणून इंडियाचे नामोनिशान मिटवून टाकायचे याच्यासारखा डरपोकपणा आणि विकृतपणा नाही.

ते म्हणतात रिपब्लिक ऑफ भारत. परंतु, खरं म्हणजे यांनी रिपब्लिक ऑफ नया भारत म्हटलं पाहिजे. कारण यांनी नया भारत निर्माण करण्याची गोष्ट केली होती.

या भारताशी इंडियाशी त्यांचा संबंध नाही. ते नेमकं कोणत्या ग्रहावरून काम करत आहे? चांद्रयानमध्ये बसून ते काय वर जाऊन काम करत आहे का? इंडिया आहे आणि इंडिया कायम राहणार आणि भविष्यात सत्तेत इंडियाचं येणार आहे.

पुढे बोलताना ते (Sanjay Raut)  म्हणाले, “त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाबद्दल आम्हाला सांगायला हवं. ते त्यांचे कार्यक्रम का लपवत आहे? आपल्या देशामध्ये एवढं गोपनीय काय सुरू आहे?

देशात ही कोणती हुकूमशाही सुरू आहे? ते आम्हाला संसदेच्या अधिवेशनाबद्दल माहिती सांगत नाही. आम्हाला संसदेमध्ये काही प्रश्न मांडायचे आहेत.

महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. आम्हाला या विषयावर आवाज उठवायचा आहे. त्यावर आम्ही आवाज उठवू शकतो की नाही? याचं उत्तर सरकारनं आम्हाला द्यायला हवं.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.