Maratha Reservation | जालना: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) जालना जिल्ह्यात उपोषणाला बसले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे.
नवव्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. प्रकृती खूप जास्त खालावल्यामुळे जरांगे यांना आज उपोषण स्थळीचं सलाईन लावण्यात आलं आहे. प्रकृती खालावली असली तरी मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम आहे.
काहीही झालं तरी उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे. मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना राज्य सरकारवर टीका केली आहे.
The government has decided to take my life – Manoj Jarange
मनोज जरांगे म्हणाले, “दोन वर्षापासून मी सरकारसोबत तह करत आहे. या दोन वर्षांमध्ये सरकारने मला काहीच दिलेलं नाही. सरकारच्या मनात नक्की काय चाललं आहे?
याबद्दल मला काहीच कल्पना नाही. सरकारने माझा जीव घ्यायचं ठरवलं आहे. फक्त आणि फक्त आशेवर आमचं हे आंदोलन सुरू आहे.”
दरम्यान, गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करत आहे. मराठा आंदोलकांना सरकारनं समजवण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र, सरकारचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरताना दिसले आहे. त्यानंतर काल राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता.
पण, राज्य सरकारचा हा प्रयत्न देखील अयशस्वी ठरला. यानंतर आज सरकारच्या वतीने गिरीश महाजन मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे काय निर्णय घेतील? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Kirit Somaiya | किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावरून लोकशाही चॅनलच्या संपादकावर गुन्हा दाखल
- Girish Mahajan | गिरीश महाजन आज पुन्हा घेणार मनोज जरांगेंची भेट; मराठा आरक्षणावर निघणार तोडगा?
- Sanjay Raut | विरोधकांनी त्यांच्या आघाडीचं नाव इंडिया ठेवल्यामुळं केंद्र सरकार घाबरलं- संजय राऊत
- Maratha Reservation | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; तरीही उपोषण सुरूच
- Uddhav Thackeray | सगळेच चोर मोदी कसे? ठाकरे गटाचा खडा सवाल