Kirit Somaiya | किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावरून लोकशाही चॅनलच्या संपादकावर गुन्हा दाखल

Kirit Somaiya | मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्य व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

या व्हिडिओची सखोल चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर या प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणामध्ये लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार (Kamlesh Sutar) आणि अनिल थट्टे (Anil Thatte) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A case has been registered against Kamlesh Sutar and Anil Thatte

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी या प्रकरणामध्ये 5 सप्टेंबर रोजी आपला जबाब नोंदवला आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यानंतर रात्री उशिरा लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थट्टे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर कमलेश सुतार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “भाजप नेते किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासात या आधीही सहकार्य केले होते, यानंतरही करू. मात्र,असं असलं तरीही जनतेची भूमिका आणि प्रश्न मांडण्याचे काम अव्याहतपणे सुरू राहील!”

दरम्यान, 17 जुलै 2023 रोजी लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीने किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसारित केला होता. याचे पडसाद विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील दिसून आले होते.

अधिवेशनादरम्यान विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve ) यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओ क्लिपचा एक पेन ड्राईव्ह सभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना दिला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली होती.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.