Prakash Ambedkar | इंडिया-भारत वादात विरोधी पक्ष भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकलाय – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | पुणे: देशाच्या नावावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. इंडिया नाव रद्द करून फक्त भारत हे एकच नाव ठेवण्याच्या चर्चा सध्या देशभरात सुरू आहे.

यानंतर देशातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. अशात या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया-भारत वादात विरोधी पक्ष भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकला असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Both India and Bharat are accepted names – Prakash Ambedkar

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “संसदेमध्ये देखील हा वाद झाला आहे. ब्रिटिशांनी काही कायदे केले होते. ते फ्रेम करत असताना त्यांनी म्हटलं होतं, भारत म्हणजेच इंडिया आहे.

त्याच्यामुळे इंडिया आणि भारत दोन्हीही नाव स्वीकारलेली आहे. इंडिया आणि भारत एकमेकांच्या विरोधात आहे, असं नाही. आपण खूप भारी आहोत हे दाखवण्यासाठी भारतीय जनता पक्षांनं मुद्दाम हा मुद्दा उपस्थित केला आहे.

इंडिया आणि भारत वादात दुर्दैवाने विरोधी पक्ष भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकला आहे. विरोधकांची इंडिया आघाडी भाजपच्या ट्रॅपमध्ये सापडली आहे.

दरम्यान, या मुद्द्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांनी पंकजा मुंडे यांना या मुद्द्यावर प्रश्न विचारला होता.

त्यावर उत्तर देत पंकजा मुंडे म्हणाल्या, “आपलं नाव भारत आहे. इंडिया हे नाव भारताचं पडलं होतं. त्या काळात कॉलनीयन लोकांनी दिलेलं हे नाव आहे.

परंतु, बॉम्बेचं जसं मुंबई होऊ शकतं, तसंच इंडियाचं भारत होऊ शकतं, अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेवर देशातील लोक काय प्रतिक्रिया देतील?

त्यांच्या प्रतिक्रियेनंतर या मुद्द्यावर निर्णय होईल. इंडिया हे नाव आता मिळालेलं आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढाई सुरू आहे. आरएसएस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या अनेक वर्षापासून ही लढाई लढत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.