Asim Sarode | CM शिंदे यांचा राजीनामा घेण्यासाठी कारणं तयार केली जात आहे का? – असीम सरोदे

Asim Sarode | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. या घटनेनंतर देखील आंदोलकांचं आंदोलन सुरूच आहे.

राज्य सरकारने मराठा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, सरकारचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहे. आम्ही मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं गेलं आहे.

याच पार्श्वभूमीवर जेष्ठ कायदे तज्ञ असीम सरोदे यांनी ट्विट केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यासाठी आणि मागण्यासाठी पार्श्वभूमी व कारणे तयार केली जात आहेत का? असा सवाल असीम सरोदे यांनी उपस्थित केला आहे.

ट्विट करत असीम सरोदे (Asim Sarode)  म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यासाठी आणि मागण्यासाठी पार्श्वभूमी व कारणे तयार केली जात आहेत का?

कारण आरक्षण हा विषय तर राज्य सरकार सोडवू शकत नाही त्यासाठी केंद्र सरकारनेच संविधानिक सुधारणा केली पाहिजे. मराठा आरक्षण हा राजकीय विषय झालाय हे दुर्दैव.”

Today is the ninth day of the ongoing hunger strike in Jalna district

दरम्यान, जालना जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. उपोषणाच्या 09 व्या दिवशी उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावली आहे.

आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे उपोषण स्थळीच जरांगे यांना सलाईन लावण्यात आली. मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यामुळे मराठा कार्यकर्त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्य सरकारने जरांगे यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे. मात्र, काहीही झालं तरी उपोषण सोडायचं नाही, असा निश्चय जरांगे यांनी केला आहे.

मनोज जरंगे यांच्या तब्येतीची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर, जालना आणि आसपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते उपोषण स्थळी दाखल होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.