Share

Pankaja Munde | बॉम्बेचं जसं मुंबई होऊ शकतं, तसंच इंडियाचं भारत होऊ शकतं – पंकजा मुंडे

Pankaja Munde | पुणे: सध्या देशाच्या नावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. देशाचं नाव इंडिया रद्द करून फक्त भारत हेच नाव ठेवण्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बॉम्बेचं जसं मुंबई होऊ शकतं, तसंच इंडियाचं भारत होऊ शकतं, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे (Pankaja … Read more

Published On: 

Pankaja Munde | पुणे: सध्या देशाच्या नावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. देशाचं नाव इंडिया रद्द करून फक्त भारत हेच नाव ठेवण्याच्या चर्चा सध्या सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बॉम्बेचं जसं मुंबई होऊ शकतं, तसंच इंडियाचं भारत होऊ शकतं, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, “आपलं नाव भारत आहे. भारताचं इंडिया हे नाव झालं होतं. बॉम्बेचं जसं मुंबई होऊ शकतं तसं इंडियाचं भारत होऊ शकतं, अशी चर्चा सुरू आहे.

या मुद्द्यावर देशातील लोक काय प्रतिक्रिया देतील? त्यांच्या प्रतिक्रियेनुसार या संदर्भात निर्णय ठरेल. आपण दोन्हीमध्ये राहत नाही. त्या काळामध्ये कॉलनीयन लोकांनी दिलेलं हे नाव आहे.

ही लढाई आताची नसून अनेक वर्षांची आहे. इंडिया हे नाव आता मिळालेलं आहे. ही लढाई अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आरएसएस  गेल्या अनेक वर्षापासून लढत आहे.”

The central government has started fearing the name of India – Sanjay Raut

दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, “विरोधकांनी त्यांच्या आघाडीचं नाव इंडिया ठेवल्यामुळे केंद्र सरकारला इंडिया नावाचं भय वाटायला लागलं आहे.

एखाद्या सरकारला आपल्या देशाच्या घटनेतील नावाची भीती वाटू लागते, हा अत्यंत विचित्र प्रकार आहे. देशातील विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे, म्हणून इंडियाचे नामोनिशान मिटवून टाकायचे, यासारखा विकृतपणा आणि डरपोकपणा नाही.

रिपब्लिक ऑफ भारत, असं ते म्हणतात. मात्र, त्यांनी रिपब्लिक ऑफ नया भारत असं म्हटलं पाहिजे. कारण यांनी नया भारत निर्माण करायची गोष्ट केली होती. या भारताशी आणि इंडियाशी त्यांचा संबंध नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही