Sanjay Raut | मी दडपशाहीचा धिक्कार करतो; किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

लोकशाही वृत्तवाहिनीने हा व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओनंतर विरोधकांनी सोमय्यांना चांगलं धारेवर धरलं होतं. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर या प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर आली होती. लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार (Kamlesh Sutar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विट करत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “कोणतीही सखोल चौकशी न करता लोकशाही चॅनल व संपादक कमलेश सुतार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे धक्कादायक आहे.

सुतार यांनी एका भंपकआणि महाराष्ट्र द्वेषाची गरळ सतत ओकणारया व्यक्तीचा खरा चेहरा उघड केला. पण चोर सोडून संन्याशाला फासावर लटकविण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे.

नागरी स्वातंत्र्याची चाड असणाऱ्या प्रत्येकाने आता या वर आवाज उठवायला हवा. पत्रकार अनिल थत्ते यांच्यावर देखील याच प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून.. मी या दडपशाहीचा धिक्कार करतो. याचा जाब 2024 ला द्यावाच लागेल!”

On July 17, 2023, a video of Kirit Somaiya went viral

दरम्यान, लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीने 17 जुलै 2023 रोजी किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसारित केला होता.

या व्हिडिओनंतर किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील दिसून आले होते.

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनादरम्यान किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओ क्लिपचा एक पेन ड्राईव्ह सभापती नीलम गोऱ्हे यांना दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची घोषणा केली होती.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.