Share

Girish Mahajan | गिरीश महाजन म्हणजे संकटमोचक, हे खरं आहे – मनोज जरांगे

Girish Mahajan | जालना: मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे.

आज गिरीश महाजन, अतुल सावे, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर आदी नेते मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी जालना जिल्ह्यात दाखल झाले आहे.

यावेळी मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांचे तोंड भरून कौतुक केलं आहे. गिरीश महाजन यांना संकटमोचक म्हणतात, ते खरं आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

For four days I will consume medicine and water – Manoj Jarange

मनोज जरांगे म्हणाले, “मी माझ्या जातीसोबत अत्यंत प्रामाणिक आहे. तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. सरकारने जर आज जीआर आणला नाही तर औषध पाणी मी आज बंद करणार होतो.

मात्र, फक्त गिरीश महाजन यांच्यामुळे मी हे सर्व घेणार आहे. चार दिवस मी औषध आणि पाण्याचे सेवन करेल. तुम्ही आम्हाला पॉझिटिव्ह केलं आहे.

गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणजे संकटमोचक असं लोक म्हणतात. लोक म्हणतात ते एकदम खरं आहे. मी उगाच कुणाची स्तुती करत नाही. मी तुमची मनापासून स्तुती केली आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले,”आम्हाला हे आंदोलन सांभाळायचं आहे. त्याचबरोबर आम्हाला स्वतःच्या जीवाची देखील काळजी घ्यायची आहे. गिरीश महाजन व्यक्ती म्हणून काय आहे?

हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. न होणारी घटना गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी घडवून आणली आहे. त्यांच्यामुळे मी पाणी पिलं आणि सलाईन देखील लावली आहे. त्यामुळं माझ आयुष्य वाढलं आहे. ”

महत्वाच्या बातम्या

Girish Mahajan | जालना: मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज नववा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now