Share

Sanjay Raut | राज्य सरकार घर कोंबड्यासारखं घरात बसलयं – संजय राऊत

🕒 1 min read Sanjay Raut | मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास राज्यातील अनेक नेत्यांनी भेट दिली आहे. मात्र, या ठिकाणी अद्याप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली नाही. काल (06 सप्टेंबर) गिरीश महाजन, संदिपान भुमरे, अर्जुन खोतकर, अतुल सावे आदि नेते मनोज जरांगे यांना … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास राज्यातील अनेक नेत्यांनी भेट दिली आहे.

मात्र, या ठिकाणी अद्याप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली नाही. काल (06 सप्टेंबर) गिरीश महाजन, संदिपान भुमरे, अर्जुन खोतकर, अतुल सावे आदि नेते मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी जालना जिल्ह्यात दाखल झाले होते.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. राज्य सरकार घर कोंबड्यासारखं घरात बसलं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange has risked his life for his society – Sanjay Raut

आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले, “मनोज जरांगे यांनी आपल्या समाजासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले आहे. एकेकाळी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अण्णा हजारे उपोषणाला बसले होते.

तेव्हा देखील गिरीश महाजन यांनीच मध्यस्थी केली होती. त्यातून काही निष्पन्न झालं नव्हतं. भ्रष्टाचार अजूनही जोरात सुरू आहे. ते फक्त अण्णांना गुंडाळून आले होते.

मात्र, मनोज जरांगे गुंडाळले जाणारे व्यक्तिमत्व नाही. मनोज जरांगे अत्यंत फकीर माणूस आहे. जेव्हा मी त्यांना भेटलो होतो, तेव्हा मला देखील आश्चर्य वाटलं होतं.

या साध्या माणसानं महाराष्ट्र सरकारला जेरीस आणलं आहे. राज्य सरकारने त्यांची बनवाबनवी करू नये. काय असेल ते सरकारनं खरं सांगायला हवं आणि समाजाला न्याय द्यायला हवा.”

किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणामध्ये लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी या मुद्द्यावर देखील भाष्य केलं आहे.

ते म्हणाले, “कमलेश सुतार हे ज्येष्ठ पत्रकार आहे. त्यांनी एका व्यक्तीचं भांडं फोड केलं आहे. त्यांनी एका व्यक्तीचा मुखवटा फोडून सत्य समोर आणलं आहे.

त्या व्यक्तीची चौकशी करायची सोडून कमलेश सुतार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या चॅनलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार अनिल थट्टे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

किरीट सोमय्या यांचं सत्य देशातील सर्व पत्रकारांनी समोर आणलं आहे. मात्र, अनिल थट्टे आणि कमलेश सुतार यांच्यावरच फक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे एक प्रकारचं टार्गेट किलिंग आहे. पत्रकार संघटनेनं या घटनेचा निषेध केला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी सरकारला याचा जाब विचारायला पाहिजे. ही एक प्रकारची हुकूमशाही आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही