Maratha Reservation | जालना: जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे.
उपोषणाच्या दहाव्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचं एक पथक उपोषण स्थळी दाखल झालं आहे.
मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्यामुळे मराठा कार्यकर्त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सरकारनं मनोज जरांगे यांच्या प्रकृतीकडं लक्ष द्यावं, असं मराठा कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
Manoj Jarange has been on hunger strike for the past ten days
गेल्या दहा दिवसापासून मनोज जरांगे उपोषणाला बसले आहे. मनोज जरांगे यांची रक्त चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा बीपी कमी झालेला असून त्यांच्या किडनीवर परिणाम होत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.
ते पाण्याचे सेवन करत नसल्यामुळे त्यांचं युरीन आउटपुट कमी झालं आहे. त्यानंतर त्यांना सलाईन देखील लावण्यात आली आहे. कालपासून (06 सप्टेंबर) मनोज जरांगे औषध आणि पाण्याचे सेवन करणार नव्हते.
मात्र, काल गिरीश महाजन यांनी जरांगे यांची समजूत काढली. गिरीश महाजन यांनी समजूत काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी औषध आणि पाण्याचे सेवन केले.
गिरीश महाजन यांच्यामुळे मी औषध आणि पाण्याचे सेवन करणार आहे. गिरीश महाजन यांना संकटमोचक म्हणतात, ते अगदी खरं आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यानंतर हे आंदोलन आणखीनच तीव्र झालं आहे. अशात सकल मराठा समाजाने मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा प्रधान करावी, अशी मागणी केली आहे.
मनोज जरांगे यांच्या जिवाला काही समाजांकडून हानी पोहोचवली जाऊ शकते. त्यांच्या जीवाला काही झालं तर राज्यातील मराठा समाज पेटून उठेल आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हिंसा घडू शकते.
या सर्व गोष्टी टाळण्यासाठी जरांगे यांच्या जिवाचं संरक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी, असं सकस मराठा समाज महाराष्ट्र यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकूमशाहीला लोकशाही म्हणायला हवं – रोहित पवार
- Sanjay Raut | राज्य सरकार घर कोंबड्यासारखं घरात बसलयं – संजय राऊत
- Uddhav Thackeray | भाजपचे हिंदुत्व ढोंगी; ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल
- Sanjay Raut | मी दडपशाहीचा धिक्कार करतो; किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
- Girish Mahajan | गिरीश महाजन म्हणजे संकटमोचक, हे खरं आहे – मनोज जरांगे