🕒 1 min read
Eknath Shinde | नांदेड: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.
अशात मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. नांदेडचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मंगेश कदम (Mangesh Kadam) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात मंगेश कदम यांनी जाहीर प्रवेश केला आहे.
त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण नांदेड अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं.
We have decided to go under the leadership of Eknath Shinde – Mangesh Kadam
मंगेश कदम यांच्यासह त्यांची पत्नी, ज्योती मनीष कदम, धम्मपाल कदम, विकास गायकवाड, प्रवीण वाघमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मंगेश कदम यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची काम करण्याची पद्धत आम्हाला आवडते. त्यामुळं आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जाण्याचं ठरवलं आहे.
राजकारणातील काही दोन नंबरच्या नेत्यांनी आम्हाला कधी संधी दिली नाही. आम्ही तब्बल सहा वेळा निवडून आलो आहोत. तरी देखील आम्हाला संधी मिळालेली नाही.
आमच्या पूर्ण कुटुंबानं काँग्रेससाठी दिवस-रात्र काम केलं आहे. आम्हाला पक्षाकडून संधी मिळेल, असं मला वाटत होतं. मात्र, आम्हाला संधी मिळाली नाही. त्यानंतर आम्ही पर्यायाच्या शोधात होतो. एकनाथ शिंदे यांचं काम बघून आम्ही शिंदे गटात प्रवेश केला.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आमचे नेते अशोक चव्हाण यांच्याबद्दल मला कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. त्यांनी आम्हाला संधी दिली आहे. मात्र, दोन नंबरच्या नेत्यांनी आम्हाला कधी संधी दिली नाही.
त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून आम्ही शिंदे गटात सामील झालो आहोत. आता आम्ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली जनसेवेचं काम करणार आहोत.”
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | CM शिंदेंनी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसू नये – रोहित पवार
- Maratha Reservation | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणस्थळी डॉक्टरांची टीम दाखल
- Rohit Pawar | नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकूमशाहीला लोकशाही म्हणायला हवं – रोहित पवार
- Sanjay Raut | राज्य सरकार घर कोंबड्यासारखं घरात बसलयं – संजय राऊत
- Uddhav Thackeray | भाजपचे हिंदुत्व ढोंगी; ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











