Rohit Pawar | CM शिंदेंनी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसू नये – रोहित पवार

Rohit Pawar | कोपर्डी: मराठा समाजाला आरक्षण मिळवं, यासाठी मनोज जरांगे जालना जिल्ह्यामध्ये उपोषणासाठी बसले आहे. तर गेल्या दोन दिवसापासून कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावामध्ये देखील मराठा कार्यकर्त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे. यावेळी बोलत असताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसू नये, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनामध्ये राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठराव मांडायला हवा. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर राज्य सरकारला देखील एक विशेष अधिवेशन बोलवावे लागेल.

यामध्ये राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारला ठराव पाठवावा. काही ठराविक लोकांना कुणबी समाजाचे दाखले देण्याचं बोललं जात आहे.

मात्र, या निर्णयामुळे सर्वांचे प्रश्न सुटणार नाही. या निर्णयानंतर काहींचे प्रश्न जसेच्या तसे राहू शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसू नये.”

Today is the tenth day of Manoj Jarange’s hunger strike

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. उपोषणाच्या दहाव्या दिवशी जरांगे यांची तब्येत अत्यंत खालावली आहे.

त्यामुळं आरोग्य विभागाचं एक पथक उपोषण स्थळी दाखल झालं आहे. यानंतर डॉक्टरांनी मनोज जरांगे यांची रक्त चाचणी केली आहे. मनोज जरांगे यांचा बीपी कमी झालेला असून त्यांच्या किडनीवर परिणाम होत आहे.

त्याचबरोबर पाण्याचं सेवन नसल्यामुळं त्यांचं युरीन आउटपुट देखील कमी झालं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. यानंतर जरांगे यांना सलाईन लावण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या