Sanjay Raut | मुंबई: उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंगू आणि मलेरियाशी केली होती.
त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सनातन धर्माबाबत उदयनिधी स्टॅलिन यांचं वैयक्तिक मत असू शकतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
About 90 crore Hindus live in our country – Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “आपल्या देशामध्ये जवळ 90 करोड हिंदू लोक राहतात. देशाच्या बाहेर देखील अनेक हिंदू राहतात. उदयनिधी स्टॅलिन हे एक मंत्री आहे.
त्यांनी सनातन धर्माविरोधात केलेल्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करणार नाही. त्यांनी अशा प्रकारची विधान करणं टाळलं पाहिजे. मात्र, उदयनिधी स्टॅलिन यांचं सनातन धर्माबद्दल वैयक्तिक मत असू शकतं. ते सनातन धर्माला मानत नाही, ते त्यांचं मत आहे.
आपल्या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, पारसी, जैन सर्व जाती धर्माचे लोक राहतात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना आणि आस्था आहे. सगळ्या धर्मामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विषय आहे.”
दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, “डास, डेंगू, मलेरिया किंवा कोरोनाला आपण विरोध दर्शवू शकत नाही. ज्या गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या गोष्टी संपवल्या पाहिजे.
आपल्याला या सर्व गोष्टी संपवायच्या आहे. सनातनाला विरोध करण्यापेक्षा तो संपवला पाहिजे. सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. सनातन हे नाव संस्कृतमधून आलं आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसला दणका! नांदेडमध्ये बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
- Rohit Pawar | CM शिंदेंनी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसू नये – रोहित पवार
- Maratha Reservation | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणस्थळी डॉक्टरांची टीम दाखल
- Rohit Pawar | नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकूमशाहीला लोकशाही म्हणायला हवं – रोहित पवार
- Sanjay Raut | राज्य सरकार घर कोंबड्यासारखं घरात बसलयं – संजय राऊत