Sharad Pawar | शरद पवार ॲक्शन मोडमध्ये; सर्व आमदार-खासदारांना तातडीनं मुंबईत बोलावलं

Sharad Pawar | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यातील जिल्ह्यांमध्ये सभा घ्यायला सुरुवात केली आहे. अशात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी खासदारांना तातडीने मुंबईला बोलावलं असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Sharad Pawar has called an important meeting of MLAs and MPs

9 सप्टेंबर 2023 रोजी शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबईत आमदार आणि खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे ही बैठक पार पडणार आहे.

माजी आमदार, माजी खासदार, शहराध्यक्ष, जिल्हाधिकारी आदींना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. शरद पवार यांनी अचानक आपल्या गटाची बैठक बोलावल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या बैठकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही बैठक बोलावली असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

या बैठकीमध्ये शरद पवार खासदार आणि आमदारांच्या कामकाजाचा आणि त्यांच्या मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याचं देखील बोललं जात आहे.

शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि जयंत पाटील (Jayant Patil) या बैठकीला संबोधित करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.