Sambhajiraje Chhatrapati | आगामी निवडणुकांसाठी संभाजीराजे छत्रपतींची जोरदार तयारी! करणार दोन दिवसांचा नाशिक दौरा

Sambhajiraje Chhatrapati | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी विविध पक्षांचे पक्षप्रमुख महाराष्ट्रभर दौरे करताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान संभाजीराजे छत्रपती उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र ठरणाऱ्या स्वराज्य भवन या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार आहे.

त्याचबरोबर या दौऱ्यात संभाजीराजेंच्या दोन जाहीर सभा पार पडणार आहे. यामध्ये पहिली सभा मुंबई नाका येथे होणार आहे, तर दुसरी सभा लासलगावमध्ये पार पडेल.

मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या आक्रमक झालेला दिसून आला आहे. मराठा समाजाचं यासाठी गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन सुरू आहे.

याचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचा (Sambhajiraje Chhatrapati) हा नाशिक दौरा असल्याचं बोललं जात आहे. कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये नाशिक हे सुरुवातीपासूनच प्रमुख केंद्र आहे.

29 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई नाका येथे संभाजीराजेंच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र स्वराज्य भवन या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. तर 10 सप्टेंबर रोजी ते येवला-लासलगावचा दौरा करणार आहे.

Sharad Pawar has called an important meeting of all NCP MLAs

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. 9 सप्टेंबर 2023 रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे ही बैठक होणार आहे. माजी आमदार, माजी खासदार, जिल्हाधिकारी, शहराध्यक्ष आदींना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवारांनी ही महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. शरद पवार यांच्या या बैठकीत काय चर्चा होईल? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.