Girish Mahajan | मी सांगितलेला आकडा परफेक्ट असतो, आम्ही 48 जागा जिंकणार – गिरीश महाजन

Girish Mahajan | मुंबई: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या एनडीए आघाडीला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे.

अशात मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे. मी सांगितलेला आकडा परफेक्ट असतो, आम्ही 48 जागा जिंकणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

The number I say is always perfect – Girish Mahajan

गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, “आगामी निवडणुकांमध्ये आम्ही 48 जागा जिंकणार आहोत, हे मी आधीच सांगितलं आहे. माझ्या अंदाजामध्ये कधीच कोणत्या प्रकारची चूक होत नाही.

मी सांगितलेला आकडा नेहमी परफेक्ट असतो. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस किती जागा लढेल आणि किती जिंकेल? हे वेळच सांगेल. मात्र आम्ही 48 जागा जिंकणार आहोत. आम्ही 32 जागा जिंकू, असं काँग्रेस सांगत असते. मात्र, असं काहीही होणार नाही. काँग्रेसने सत्य बोलायला हवं.”

गेल्या अकरा दिवसांपासून मराठा समाजाचं आरक्षणासाठी जालना जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन सुरू आहे. आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असं मराठा कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलत असताना गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

गिरीश महाजन म्हणाले, “उद्धव ठाकरे तब्बल अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असताना ते कधीच घरातून बाहेर निघाले नाही. त्यामुळं मराठ्यांना आरक्षण न मिळण्यामागे उद्धव ठाकरे दोषी आहेत.

सध्या उद्धव ठाकरे वटहुकूम काढण्याची भाषा करत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.