Maratha Reservation | जालना: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे.
उपोषणाच्या नवव्या दिवसापासून जरांगे यांची तब्येत अत्यंत खालावली आहे. यानंतर आरोग्य विभागाचं एक पथक उपोषण स्थळी दाखल झालं आहे.
पुढील तीन दिवस मी औषध आणि सलाईन लावून घेणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर देखील सरकारने मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण केलेली नाही.
यानंतर मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. माझ्या मागणीनुसार उद्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या जर सरकारचा निरोप आला नाही तर मी सलाईन काढणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
I will not drink water from tomorrow – Maratha Reservation
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे म्हणाले, “राज्य सरकारसाठी आम्ही आमचं एक पाऊल मागे घेतलं होतं. राज्य सरकारचा काल रात्रीच निरोप यायला हवा होता.
परंतु, सरकारचा अद्याप निरोप आलेला नाही. आम्ही आज दिवसभर सरकारच्या निरोपाची वाट बघणार आहोत. मात्र, आज जर सरकारचा निरोप आला नाही तर उद्यापासून मी पाणी पिणार नाही आणि सलाईन काढणार आहे. राज्य सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्याचबरोबर आम्ही आमच्या निर्णयावर कायम ठाम आहोत.”
राज्य सरकारने वंशावळी कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी अशा नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत जीआर काढला आहे. मात्र, हा निर्णय आमच्या काहीच कामाचं नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
सरकारने जीआरमधून वंशावळी शब्द वगळून सरसकट मराठा समाज (Maratha Reservation) करून टाकावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. यासाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरूच राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ambadas Danve | राज्यात दुष्काळ अन् भाजपला निवडणुकीची चिंता; अंबादास दानवे यांचा भाजपला टोला
- Uddhav Thackeray | मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमध्ये जनतेला सामोरे जाण्याचे धाडस नाही; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- Sambhajiraje Chhatrapati | आगामी निवडणुकांसाठी संभाजीराजे छत्रपतींची जोरदार तयारी! करणार दोन दिवसांचा नाशिक दौरा
- Bacchu Kadu | दिव्यांगांना निधी दिला नाही, तर राज्य सरकारच्या विरोधात उपोषण करू – बच्चू कडू
- Radhakrishna Vikhe Patil | मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा मुद्द्या जास्त ताणू नये – राधाकृष्ण विखे पाटील