Jayant Patil | राष्ट्रवादीचं चिन्ह कोणाला मिळणार? जयंत पाटील म्हणतात…

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: जुलै महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले.

त्यानंतर अजित पवार गटानं राष्ट्रवादीच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

BJP will have to face a big opposition – Jayant Patil 

जयंत पाटील म्हणाले, “वर्षभरापूर्वी शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घडत आहे. आमच्यातील काही लोक राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर त्यांनी दावा ठोकला आहे. त्यांचा दावा तुम्ही सर्वांनी टीव्हीवर पाहिला असेल.

निवडणूक आयोगानं त्यांना कबूल केलेलं असून पक्षाचं चिन्ह आणि नाव त्यांच्याकडं जाणार, असं वाटायला लागलं आहे. शिवसेनेसोबत जे घडलं आहे, तेच राष्ट्रवादीसोबत घडताना दिसत आहे.

मात्र, यावेळी राज्यातील जनता हे सर्व खपवून घेणार नाही, असं मला वाटतं आहे. भारतीय जनता पक्षाला मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागणार आहे.”

दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काल (07 सप्टेंबर) सुप्रिया सुळे यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. अजित दादा पुन्हा येतील का? या प्रश्नाचं उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बारामतीची साखर तुमच्या तोंडात पडो.

दोन भाऊ सध्या वेगवेगळ्या रो हाऊसमध्ये राहत आहे. त्यांच्यामध्ये फक्त एक कंपाउंड आहे. सध्या एक वैचारिक लढाई सुरू आहे. निवडणुका जवळ आल्या तर या लढाईचं रूपांतर राजकीय लढाईमध्ये होईल.

राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आहे. तर जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.