Radhakrishna Vikhe Patil | धनगर आरक्षणाचा मुद्दा तापणार? कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर उधळला भंडारा

Radhakrishna Vikhe Patil | सोलापूर: गेल्या अकरा दिवसांपासून जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. अशात धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भंडारा टाकल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Radhakrishna Vikhe Patil is currently visiting Solapur

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil ) सध्या सोलापूर दौऱ्यावर आहे. आज ते सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात थांबले आहे. यावेळी धनगर कार्यकर्ते शेखर बंगाळे काही कार्यकर्त्यांसह राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटायला आले होते.

त्यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला आहे. हा भंडारा उधळत असताना त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आहे.

यानंतर बंगाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या या कृत्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे.

दरम्यान, धनगर आरक्षणासह मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील चांगलं तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे गेल्या अकरा दिवसांपासून जालना जिल्ह्यात उपोषण करत आहे. उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे.

यानंतर मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. ते म्हणाले, “आम्ही आज दिवसभर सरकारच्या निरोपाची वाट बघणार आहोत. आज जर सरकारचा निरोप नाही आला तर उद्यापासून मी सलाईन लावणार नाही आणि पाणी देखील पिणार नाही.

सरकारसोबत आम्ही चर्चा करायला तयार आहोत. राज्य सरकारने वंशावळी कुणबी-मराठा आणि कुणबी-मराठा अशा नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत जीआर काढला आहे. मात्र, हा निर्णय आमच्या काहीच उपयोगाचा नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.