Maratha Reservation | जालना: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या अकरा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे.
उपोषणाच्या अकराव्या दिवशी मनोज जरांगे यांची आई उपोषण स्थळी दाखल झाली आहे. उपोषण स्थळी दाखल होताचं जरांगे यांच्या आईने भावूक प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, माझ्या बाळाला न्याय द्या, असं मनोज जरांगे यांच्या आईने म्हटलं आहे.
Give justice to my baby – Manoj Jarange mother
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे यांच्या आई आज उपोषण स्थळी दाखल झाल्या आहे.
उपोषण स्थळी आईला पाहून जरांगे यांना अश्रू अनावर झाले. मराठ्यांना आरक्षण द्या. माझ्या बाळाला न्याय द्या. सर्वांना न्याय द्या. सर्वांचा आशीर्वाद घ्या, असं मनोज जरांगे यांच्या आईने म्हटलं आहे.
दरम्यान, उपोषणाच्या नवव्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालवली होती. त्या दिवशीच आरोग्य विभागाचं एक पथक उपोषण स्थळी दाखल झालं. पुढील तीन दिवस मी औषध आणि सलाईन लावून घेणार असं मनोज जरांगे यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
त्यानंतर देखील सरकार जरांगे यांची मागणी पूर्ण केलेली नाही. यानंतर मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “माझ्या मागणीनुसार उद्याचा दिवस शेवटचा आहे.
उद्यापर्यंत जर सरकारचा निरोप नाही आला तर मी औषध घेणार नाही आणि सलाईन देखील लावणार नाही. आज दिवसभर आम्ही सरकारच्या निरोपाची वाट बघणार आहोत. मात्र आज सरकारचा निरोप नाही आला तर उद्यापासून मी औषध, पाणी आणि सलाईनचा त्याग करणार आहे”, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Radhakrishna Vikhe Patil | उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं मनोरंजक वाटतं – राधाकृष्ण विखे पाटील
- Gopichand Padalkar | धनगर कार्यकर्त्यांनी उधळलेला भंडारा विखे पाटलांनी खंडोबाचा आशीर्वाद समजावा – गोपीचंद पडळकर
- Pankaja Munde | मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं संवैधानिक दृष्ट्या शक्य नाही – पंकजा मुंडे
- Jayant Patil | राष्ट्रवादीचं चिन्ह कोणाला मिळणार? जयंत पाटील म्हणतात…
- Radhakrishna Vikhe Patil | धनगर आरक्षणाचा मुद्दा तापणार? कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर उधळला भंडारा