Gopichand Padalkar | धनगर कार्यकर्त्यांनी उधळलेला भंडारा विखे पाटलांनी खंडोबाचा आशीर्वाद समजावा – गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar | मुंबई: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी गेल्या 11 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला असल्याची घटना घडली होती.

या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली गेली होती. यानंतर राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत यायला सुरुवात झाली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भंडारा उधळण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

अशात या प्रकरणावर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनगर कार्यकर्त्यांनी उधळलेला भंडारा विखे पाटलांनी खंडोबाचा आशीर्वाद समजावा, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

It is not appropriate to use Bhandara for agitation – Gopichand Padalkar 

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, “समस्त बहुजन समाजासाठी भंडारा श्रद्धेचं आणि आस्थेचं प्रतीक आहे. जर काही लोकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जर भंडारा उधळला असेल तर तो त्यांनी खंडोबाचा आशीर्वाद समजावा.

परंतु, आंदोलनासाठी भंडाऱ्याचा वापर करणे योग्य नाही. हा भंडारा लोक खंडोबाचा आणि बिरोबाचा आशीर्वाद म्हणून कपाळाला लावतात.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर आहे. विखे पाटील आज सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात थांबले आहे. यावेळी धनगर कार्यकर्ते शेखर बंगाळे काही कार्यकर्त्यांसह विखे पाटील यांना भेटायला आले होते.

तेव्हा त्यांनी विखे पाटलांवर भंडारा उधळला. त्यानंतर त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा देखील केली आहे. त्यांच्या या कृत्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.