Share

Radhakrishna Vikhe Patil | उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं मनोरंजक वाटतं – राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil | सोलापूर: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नगर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देत आहे. उद्धव ठाकरे नगर जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांशी  संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांच्या … Read more

Published On: 

Radhakrishna Vikhe Patil | सोलापूर: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नगर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देत आहे.

उद्धव ठाकरे नगर जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांशी  संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं मनोरंजक वाटतं, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

People will not take Uddhav Thackeray tours seriously – Radhakrishna Vikhe Patil

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आज सोलापूर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान प्रसार माध्यमांनी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देत असताना विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यात उद्धव ठाकरे यांना मनोरंजन वाटत आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पन्नास हजार रुपये एकरी मदत केली पाहिजे, ही मदत मिळाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, असं एकदा उद्धव ठाकरे म्हणाले होते.

त्याचं काय झालं आहे? अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं. तेव्हा त्यांनी काय केलं? सत्तेत असताना उद्धव ठाकरेंना शेतकरी दिसला नव्हता का? विमा कंपन्यांना आम्ही सोडणार नाही, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले होते.

त्यासंदर्भात त्यांनी मोर्चे देखील काढले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी विमा कंपन्यांवर कारवाई का केली नाही?  त्यांचे हे सर्व दौरे राजकीय उद्देशाने सुरू आहे. म्हणून लोक त्यांचे दौरे गांभीर्याने घेणार नाही, असं मला वाटतं.

दरम्यान, सोलापूर दौऱ्यावर असताना राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. धनगर आरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते आज सोलापूरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटायला आले होते.

यावेळी त्यांनी विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळत धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. धनगर कार्यकर्त्यांच्या या कृत्यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही