Radhakrishna Vikhe Patil | धनगर कार्यकर्त्यांना मारहाण करणं पडलं महाग; विखे पाटलांविरुद्ध धनगर समाज आक्रमक

Radhakrishna Vikhe Patil | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला आहे. अशात धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काल (08 सप्टेंबर) राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान धनगर आरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते शेखर बंगाळे काही कार्यकर्त्यांसह राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटायला गेले होते.

यावेळी या कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर बंगाळे यांना सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली. या घटनेनंतर धनगर समाज आक्रमक झाला आहे.

मारहाण करणाऱ्या विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगर जिल्ह्यातील धनगर समाजाने केली आहे.  यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चिंतेत भर पडली आहे.

धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर भंडारा उधळल्यानंतर विखे पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Bhandara is considered very sacred – Radhakrishna Vikhe Patil

विखे पाटील म्हणाले, “भंडारा हा अत्यंत पवित्र मानला जातो. या भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाली, याचा मला अत्यंत आनंद आहे. प्रत्येकाची प्रतिकारात्मक भावना व्यक्त करण्याची एक वेगळी पद्धत असते.

म्हणून धनगर कार्यकर्त्यांनी काही वेगळं केलं असं मला वाटत नाही. परंतु कोणतीही घटना घडली तर त्या घटनेची स्वाभाविक प्रतिक्रिया असते. सुरक्षा रक्षकांकडे माझ्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

त्यामुळे अचानक भंडारा उधळल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांची मारहाण केली. म्हणून संबंधितांवर कारवाई आणि गुन्हे दाखल करू नये, अशी सूचना मी पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.