Pankaja Munde | ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावू नका – पंकजा मुंडे

Pankaja Munde | धाराशिव: जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या बारा दिवसापासून उपोषण करत आहे.

या उपोषणाची राज्यात चांगली चर्चा रंगली आहे. अशात या प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे. मराठा समाजाला ठोस आरक्षण हवं आहे. या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावू नका, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Maharashtra needs stability and peace – Pankaja Munde 

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसींचा पाठिंबा आहे. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका.

दोघांची भांडण लावून तिसरी माणसं गंमत पाहतील, हे महाराष्ट्राला नको आहे. महाराष्ट्राला स्थैर्य आणि शांतता हवी आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद होण्याचा कोणताच विषय नाही.

मराठा समाजाला आता शब्द आणि दिशाभूल नको आहे. त्यांना आता ठोस आरक्षण पाहिजे. मराठा समाजाला किती आणि कसं आरक्षण देता येईल?

यासाठी सरकारकडे एक आराखडा असतो. त्या आराखड्यावर सरकारने आंदोलकांशी विश्वासाने आणि हिमतीने चर्चा करून मार्ग काढायला हवा.”

पुढे बोलताना त्या (Pankaja Munde) म्हणाल्या, “केंद्र सरकारच्या मराठा आरक्षणाबाबत वेगळ्या अडचणी असतील. मात्र, राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्याच्या या प्रश्नाकडे केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवं.

50 टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचे नसेल तर मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देता येईल? याबाबत सरकारने विचार करायला हवा. मराठा आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षावर न्यायची असेल, तर देश पातळीवर सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागेल.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.