Maratha Reservation | जालना: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी गेल्या बारा दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. त्यांनी हे उपोषण मागे घ्यावं, यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.
मात्र, उपोषणकर्ते मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी उपोषणावर ठाम आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा समाजानं उपोषण सुरू केलं आहे.
उपोषणादरम्यान सात ते आठ जणांची प्रकृती अत्यंत खालवली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे संवाद साधत उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.
मनोज जरांगे यांच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी गजानन पाटील हिप्परगेकर ( ता.नायगाव), हनुमंत बालाजी ढगे (ता.नायगाव), संभाजी पाटील गोंधळे, नामदेव पाटील डाकोरे (ता.कंधार), दत्ता पाटील हडसनिकर (ता.हदगाव), सतिश पाटील हिप्परगेकर, आकाश पाटील कल्याणकर ( ता.कंधार), जयवंत कदम, स्वप्नील कदम, संतोष कदम, आकाश शिंदे (ता.अर्धापूर) यांनी देखील उपोषण सुरू केलं आहे.
यांच्यातील बहुतांश आंदोलकांची प्रकृती अत्यंत खालवली आहे. यानंतर मराठा आरक्षणाचं आंदोलन आणखीन तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं त्यांनी त्यांचं आंदोलन मागं घ्यावं, यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.
Maratha protestors held a meeting with the state government delegation
दरम्यान, काल (08 सप्टेंबर) मराठा आंदोलकांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक झाली आहे. साधारण साडेतीन तास ही बैठक सुरू होती.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात काय कायदेशीर अडचणी येऊ शकतात? याबाबत राज्य सरकारने आंदोलकांना सांगितलं आहे. या समस्यांवर कशाप्रकारे तोडगा काढण्यात येईल? याबाबत देखील चर्चा या बैठकीत झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
या सर्व समस्यांवर तोडगा काढून पुढच्या महिन्यात राज्य सरकार एक अहवाल सादर करेल. त्यानंतर राज्य शासन मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय घेईल, असं या बैठकीत ठरवलं गेलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Radhakrishna Vikhe Patil | धनगर कार्यकर्त्यांना मारहाण करणं पडलं महाग; विखे पाटलांविरुद्ध धनगर समाज आक्रमक
- Shambhuraj Desai | मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व सोयी सुविधा देणार – शंभूराजे देसाई
- Uddhav Thackeray | महागाई वाढत असताना राज्यातील सत्ताधारी आत्मनंदात मग्न; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- Sharad Pawar | शरद पवार गटाचा अजित पवारांना मोठा झटका; 40 आमदारांना अपात्र करण्याची मागणी
- Deepak Kesarkar | मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीमागे कट असण्याची शक्यता – दीपक केसरकर