Share

Ajit Pawar | राज्य सरकार मनोज जरांगेंना समजवण्यात कमी पडतंय – अजित पवार

🕒 1 min readAjit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. त्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं, यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची काल राज्य शासनासोबत बैठक पार पडली.Related News for Youजयंत … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे.

त्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं, यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची काल राज्य शासनासोबत बैठक पार पडली.

काल (08 सप्टेंबर) मराठा समाजाच्या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाने राज्य शासनाची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिगृहाची बैठक पार पडली.

या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

We are failing to convince Manoj Jarange – Ajit Pawar

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत राज्य शासन आणि मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू होती. या बैठकीमध्ये मी जास्त चर्चा केली नाही.

कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंशी संवाद साधला आहे. या प्रकरणावर राज्य सरकारने जो जीआर काढला आहे तो मनोज जरांगे यांना मान्य नाही. मनोज जरांगे यांना सरकारने घेतलेला निर्णय पटला पाहिजे.

सरकार यासाठी प्रयत्न करत आहे. मनोज जरांगे यांच्या भेटीला राज्य सरकारने आज शिष्टमंडळ पाठवलं आहे. आम्ही मनोज जरांगे यांना समजावण्यात कमी पडत आहोत.”

दरम्यान, या प्रकरणावरून सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार ((Sharad Pawar)) यांच्यावर खोचक टीका केली आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं सरकार उलटून टाकलं होतं. त्यामुळे शरद पवार एका ब्राह्मण नेतृत्वावर मराठा आरक्षणाचं खापर फोडताना दिसत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आरक्षण घालवलं होतं. शरद पवारांनी मराठा समाजाची माती केली आहे. हे पाप फेडण्यासाठी त्यांना आता आझाद मैदानावर उपोषण करावं लागणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!