Narendra Modi | PM मोदींसमोरील G-20 परिषदेतील नामफलक सोशल मीडियावर व्हायरल; नक्की काय आहे प्रकरण?

Narendra Modi | नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून देशामध्ये G-20 परिषदेची जोरदार तयारी सुरू होती. आजपासून (09 सप्टेंबर) दिल्लीत G-20 परिषदेला सुरुवात झाली आहे.

या परिषदेसाठी जगभरातील महत्त्वाच्या देशांचे प्रमुख नेते भारतामध्ये दाखल झाले आहे. G-20 परिषदेला सुरुवात होताचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोनंतर देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

The name India is being mentioned by omitting the name Bharat

सरकारच्या अनेक दस्तावेजावर गेल्या काही दिवसांपासून इंडिया हे नाव वगळून भारत नावाचा उल्लेख केला जात आहे. G-20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेत देखील प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला होता.

अशात G-20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासमोर ठेवण्यात आलेल्या नामफलकावर देखील भारत असाच उल्लेख करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींच्या नामफलकाचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोनंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे.

दरम्यान, G-20 परिषदेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “G-20 परिषदेसाठी सर्व राष्ट्रांचे प्रमुख दिल्लीमध्ये दाखल झाले आहे.

भारतामध्ये हे पहिल्यांदा घडत नाहीये. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळात देखील अशा प्रकारच्या बैठका झाल्या होत्या.

चीनचे राष्ट्राध्यक्ष मिस्टर पुतीन या परिषदेसाठी भारतात दाखल झाले नाही. त्यांनी भारतातल्या काही भागावर अतिक्रमण केलं आहे. या बैठकीच्या माध्यमातून गेलेली जमीन परत मिळणार आहे का? असं जर होणार असेल तर या बैठकीचा आम्ही आनंदाने स्वागत करू.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.